नवी दिल्ली : आज देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा दलाच्या जवानांसोबत हा सण साजरा करण्यासाठी छत्तीसगडच्या दौर्यावर आहेत. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत, पंतप्रधान मोदी सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बस्तरचा दौरा करत आहेत. बस्तरला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी दीपोत्सवाच्या निमित्ताने देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ङ्गङ्घमी आपल्या शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी बस्तरला जात आहे. तिथे कालपर्यंत नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला होता, तिथे आज विकासाचा झरा वाहत आहे. मी शूर सैनिकांना, त्यांच्या त्यागाला, समर्पणाला आणि निष्ठेला आदरांजली वाहण्यासाठी जात आहे.पंतप्रधान मोदींनी लिहिले, देशभरातील माझ्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात शेतकर्यांसोबत दिवाळी साजरी केली. फडणवीस यांच्या या कृतीचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ङ्गङ्घमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारी सावंगा गावात शेतकर्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आणि अरुणाबाई व रामभाऊ बाळपांडे यांच्या निवासस्थानी राहण्याचा घेतलेला पुढाकार हृदयस्पर्शी आहे. यातून महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकर्यांसाठी किती कळकळीने काम करत आहे आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करत आहे, हे दिसून येते.ङ्घङ्घ